मुंबई – राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी केवळ आडनाव ठाकरे असून चालत नाही, अशी बोचरी टीका मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर केली होती. अमृता यांच्या या टीकेला प्रत्युतर देताना शिवसेना नगरसेवक अमेय घोले यांनी सत्तालोभी आनंदीबाईंनी रघुनाथदादा पेशवेंची बुद्धी भ्रष्ट केल्याचे म्हटले आहे.
इतिहासात रघुनाथदादा पेशवे हे बुद्धिमान, पराक्रमी असल्याचे सुरुवातीचे उल्लेख आहेत. त्यांची बुद्धी सत्तालोभी आनंदीबाईंनी भ्रष्ट केली. नैतिकतेचाच मुडदा त्यांनी पाडला आणि राघोबा खलनायक ठरले. इतिहास हा वर्तमानात विसरायचा नसतो!असे अमेय घोले यांनी ट्विटरद्वारे प्रत्युत्तर देताना अमृता फडणवीस यांच्यासाठी ‘आजच्या आनंदीबाई’ हा हॅशटॅग देखील वापरला आहे.
click and follow Indiaherald WhatsApp channel