अमरावती : राज्यमंत्री बच्चू कडू यांनी कर्जमाफीवर एक गंभीर आरोप केला आहे. कर्जमाफीसाठी बँकेद्वारे सुरू असलेल्या हिशोबमध्ये जाणून-बुजून गडबडी केली असल्याची अनेक शेतकऱ्यांनी बच्चू कडू यांच्याकडे तक्रार केली आहे.

 

त्यामुळे बच्चू कडू यांनी याची दखल घेत राज्य सरकारकडे अहवाल सादर केला आहे. ज्यामध्ये त्यांनी स्पष्ट केलं की, सरकार दोन लाख रुपयांपर्यंत कर्ज माफ करणार आहे. पण ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतलं त्या शेतकऱ्यांना अनेक बँकांनी दुप्पट-तिप्पट व्याज आकारणी केली आहे.

 

जिल्हा मध्यवर्ती बँक आणि काही राष्ट्रीयीकृत बँकेने तीन ते चार पट व्याज लावल्याचे बच्चू कडू यांच्या निदर्शनास आले. यावेळी मुद्दल व व्याज असे मिळून बँकेत 30 सप्टेंबर 2019 पर्यंत हप्ते न भरणारे आणि दोन लाख रुपयांपर्यंत थकबाकी असलेल्यांना कर्जमाफी मिळणार आहे, पण या हिशोबामध्ये मोठी गडबड झाली असल्याचा गंभीर आरोप राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केला आहे.                                                                                                                                      

మరింత సమాచారం తెలుసుకోండి: