काँग्रेसचे पुर्व अध्यक्ष राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकार हल्लाबोल केला आहे. राहुल गांधींनी यावेळी जीडीपीच्या मुद्द्यावरून मोदी सरकारवर निशाना साधला आहे. देशाच्या जीडीपीत आलेली ऐतिहासिक घसरणीला जीएसटी कारणीभुत असल्याचं राहुल गांधींनी म्हटले आहे.
राहुल यांचे मते, जीएसटीत आलेल्या घसरणीचं मोठं कारण मोदी सरकारचं "गब्बर सिंह टॅक्स" हा आहे. जीसटीमुळे देशातील गरीब, लघु उदयोग, लघु तसेच मध्यम व्यवसाय आणि शेतकरी तसेच मोलमजुरी करणाऱ्या अशा लोकांवर याचा मोठा फटका बसला आहे.
देशातील अर्थव्यवस्थेच्या घसरणीच्या पार्श्वभुमीवर राहुल गांधींनी एक व्हिडिओ आपल्या ट्विटरवर पोस्ट केला आहे. त्यात त्यांनी मोदी सरकारच्या धोरणांवर टिका केली आहे. ट्विटर संदेशात राहुल गांधींनी लिहले आहे की, " देशातील जीडीपीच्या घसरणीचं कारण मोदी सरकारचं गब्बर सिंह टॅक्स हा कारणीभुत आहे.
त्यामुळे अनेकांचे रोजगार गेले आहेत. सोबतच लघु व्यवसाय ठप्प झाले असून, लाखों तरुणांच्या नोकऱ्यांवर गदा आली आहे. तसेच कित्येक राज्याची अर्थव्यवस्था सुद्धा विस्कळीत झाली आहे." पुढे राहुल यांनी लिहले आहे की, " जीएसटी म्हणजे आर्थिक सर्वनाश" असा ट्विट राहुल गांधी यांनी केला असून, त्याद्वारे त्यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे.
https://mobile.twitter.com/RahulGandhi/status/1302464041831424001?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1302464041831424001%7Ctwgr%5Eshare_3&ref_url=https%3A%2F%2Famnews.live%2F
click and follow Indiaherald WhatsApp channel