मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा दोन दिवसीय कोकण दौरा आज पूर्ण झाला. यावर माजी खासदार आणि भाजप नेते निलेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्या या दौऱ्यावर टीकास्त्र सोडले आहे.निलेश राणे यांनी ट्वीटर च्या माध्यमातून उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे.

 

१)जिल्हा नियोजन आढावा बैठकीत एकही निर्णय नाही

२)कोकणातील विकास कामांना दिलेल्या स्थगीतीवर निर्णय नाही

३)निर्णय घेण्याची धमक नाही तर आढावा का?

४)एक नवीन पैसा कोकणासाठी जाहीर केला नाही.

५)पत्रकार परिषद नाही.

६)मुख्यमंत्र्यामुळे अंगणेवडीत भाविकांची गैरसोय

वरील प्रश्न विचारात एकंदरीत या दौऱ्याचे फलित काय ? असा प्रश्न विचारला आहे.

 

तर ,मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यामधून कोकणाला काय मिळाले, तसेच सिंधुदुर्गात मुख्यमंत्री नव्हे, पर्यटक आले होते, असा टोला लगावत महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपा नेते राज्यसभा खासदार नारायण राणे यांनी जोरदार टीका केली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे दोन दिवस कोकण दौऱ्यावर होते.

 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पदाचा कार्यभार पेलवत नाही. त्यामुळे तेच स्वतःहून पदाचा त्याग करतील. आणि मध्यावधी निवडणुका होतील. कारण मुख्यमंत्र्यांना पदावर राहायच नाही. शिवसेनेत असंतोष आहे हे मी सांगायला नको. यापूर्वीही मारामारी केली आहे. सत्तेसाठी लाचारी केली हे शिवसैनिकांना आवडलेलं नाही,असंही राणे यांनी म्हटले आहे.                                                              

మరింత సమాచారం తెలుసుకోండి: