3डी प्रिटिंगद्वारे वैज्ञानिकांची कल्पना सत्यात उतरवण्यास मदत होत आहे. अशाच एका मूळ भारतीय वंशाच्या वैज्ञानिकाने आपल्या टीमबरोबर मिळून या तंत्रज्ञानाद्वारे प्लास्टिकच्या एका क्यूबला बुलेट प्रुफ बनविण्यास यश मिळवले आहे.
अमेरिकेच्या राइस युनिवर्सिटीच्या वैज्ञानिकांनी हे यश मिळवले आहे. त्यांनी 3डी प्रिटिंगच्या मदतीने एक असे पॅटर्न डिझाईन केले, ज्याच्या मदतीने प्लास्टिकला बुलेट प्रुफ बनवता येते. याच्या मदतीने बनविण्यात आलेले प्लास्टिक हिऱ्याएवढेच कडक असते.
या मागे एक थेअरी आहे. यानुसार, एका आयताच्या तुलनेत त्रिकोणाची अनेक पटीने Structural Integrity असते. याच थेअरीनुसार, वैज्ञानिकांनी एका क्यूबच्या सर्व कोणांचा अभ्यास केला. त्यानंतर त्यांनी त्याचे Structural Integrity वाढवण्यासाठी नवीन पॅटर्न्स बनवले. त्यानंतर त्यांनी प्लास्टिकचे एक मोठे क्यूब तयार करून त्याचे परिक्षण केले.
त्यांनी असे दोन क्यूब तयार केले व त्याच्यावर ताशी 5.6 किमी वेगाने जाणाऱ्या गोळ्या शूट केल्या. या गोळ्या या दोन्ही क्यूबला खूपच कमी नुकसान पोहचवू शकल्या. याद्वारे वैज्ञानिकां या परिणामावर पोहचले की, प्लास्टिकचे हे क्यूब कोणत्याही ताकदवर आव्हाना सहन करण्यास सक्षम आहेत.
या शोधामुळे वैज्ञानिक महागड्या आणि दुर्मिळ वस्तूं शिवाय देखील मजबूत वस्तू तयार करू शकतात. याच्या मदतीने भविष्यात हल्की व स्वस्त बुलेट प्रुफे जॅकेट देखील बनवले जाऊ शकते.
click and follow Indiaherald WhatsApp channel