दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालाचं चित्र जवळपास स्पष्ट झालं आहे. भाजपाला स्पष्ट बहुमत मिळत असून, केजरीवाल सलग तिसऱ्यांदा दिल्लीचे मुख्यमंत्री होणार आहेत. सध्या आप ५१ जागांवर, भाजपा १९ जागांवर आघाडीवर आहे. काँग्रेसला मानहानीकारक पराभव स्वीकारावा लागणार आहे.

 

भाजपने पूर्ण ताकद लावूनही आठ वर्षे जुन्या आम आदमी पक्षाने मुसंडी मारली आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी मतमोजणी सुरू झाल्यानंतर आपने सुरुवातीला घेतलेली आघाडी सर्व कल हाती येईपर्यंत कायम राहिली. त्यातच भाजप कार्यालयात लागलेल्या पोस्टरमुळे भाजपने पराभव स्वीकारल्याचंही दिसून आलं.

 

दरम्यान, दिल्ली विधानसभा निवडणुकीचे जे कल येत आहे. त्यात भाजपा आणि आपमध्ये तफावत दिसत आहे. पण, अजून वेळ आहे त्यामुळे आम्ही आशावादी आहोत. जे काही निकाल येतील त्याला मी जबाबदार असेल," असं भाजपाचे दिल्लीचे प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी यांनी म्हटलं आहे.                                                                                                                                             

 

https://twitter.com/ANI/status/1227090555856809984?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1227090555856809984&ref_url=https%3A%2F%2Fmaharashtradesha.com%2Fwhatever-the-outcome-i-am-responsible-manoj-tiwari%2F

 

మరింత సమాచారం తెలుసుకోండి: