मुंबई : राज्याचा अर्थसंकल्प सादर केल्यानंतर विरोधकांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला. ‘जसं गारुडी लोकांना आपल्या पोत्यातून काहीतरी विशेष अशी जिवंत वस्तू बाहेर काढणार असं सांगून खिळवून ठेवण्याचा प्रयत्न करतो. तसंच हा अर्थसंकल्प लोकांना खिळवून ठेवतो अशी टीका शेतकरी नेते आणि माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी महाविकास आघाडी सरकारच्या पहिल्या अर्थसंकल्पावर केली.

 

तसेच महाविकास आघाडी सरकारच्या अर्थसंकल्पातील फक्त १ -२ मुद्दे चांगले होते. पेट्रोलच्या दारात १ रुपया करण्यात येणाऱ्या वाढीचा आम्ही निषेध करतो, अशी प्रतिक्रिया भाजप नेते आणि माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

 

याचाच धागा पकडत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांना सडेतोड प्रत्युत्तर दिलं आहे. याबाबत ते मध्य्बोल्त होते. ते म्हणाले, ‘मी काय, मुख्यमंत्री काय आम्ही शब्दांचे पक्के आहोत आणि विरोधकांसारखा शब्दांचा, आकड्यांचा खेळ आम्हाला जमत नसल्याचं म्हणत विरोधकांवर हल्लाबोल केला आहे.

 

दरम्यान, तसेच त्यांनी राज्यात राबवण्यात येणाऱ्या योजनांचीही माहिती दिली. राज्यातील २८,00६ ग्रामपंचायतींपैकी जवळपास ४२५२ ग्रामपंचायतींना स्वत:च्या कार्यालयासाठी स्वतंत्र इमारत नाही. त्यासाठी म्हणून २0२0-२१ या आर्थिक वर्षात राज्यातील १0७४ ग्रामपंचायतींना इमारत बांधण्याकरिता १५0 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे,’ अशी माहिती अजित पवार यांनी दिली.

 

మరింత సమాచారం తెలుసుకోండి: