अभिनेत्री अमृता सिंगसोबत विभक्त झाल्यानंतर सैफ अली खानने करीना कपूरसोबत दुसरा संसार थाटला. परंतु आजही सारा (Sara Ali Khan)आणि इब्राहिम ही दोन्ही मुलं त्याच्यासोबत राहतात. विशेष म्हणजे करीना या दोघांचीही सावत्र आई असून देखील त्यांच्यामध्ये मैत्रीपूर्ण नातं आहे. सारा आणि करीना या दोघींची चांगली मैत्री असून त्यांच्यातलं बॉण्डींग अनेक वेळा पाहायला मिळतं. अलिकडेच एका कार्यक्रमामध्ये करीनाने साराला वन नाईट स्टॅण्डबाबत प्रश्न विचारला. त्यावर सारानेदेखील अगदी बिनधास्तपणे या प्रश्नाचं उत्तर दिलं.
सध्या सारा (Sara Ali Khan) ‘लव आज कल’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त असून तिने अलिकडेच करीनाच्या ‘व्हॉट वुमेन वॉण्ट’ या शोमध्ये हजेरी लावली होती. या कार्यक्रमामध्ये साराने तिच्या प्रोफेशनल लाइफसोबतच पर्सनल लाइफविषयीही अनेक गोष्टींचा खुलासा केला. याचदरम्यान रॅपिड फायरमध्ये करीनाने साराला वन नाइट स्टॅण्डबाबत तिचं मत विचारलं. यावर सारानेदेखील क्षणाचा विलंब न करता उत्तर दिलं.
‘वन नाईट स्टॅण्डबाबत तुझा विचार काय आहे?’ असा प्रश्न करीनाने विचारला. त्यावर ‘मी असं अजिबात करु शकत नाही’, असं उत्तर साराने दिलं. हा प्रश्न विचारताना करीनालादेखील ओशाळल्यासारखं झालं होतं. मात्र साराचं उत्तर ऐकून करीनाची चिंता दूर झाल्याचं दिसून आलं. तसंच ‘प्रियकराला खट्ट्याळ विनोद पाठवतेस का?’ असाही प्रश्न करीनाने विचारला. त्यावर ‘हो. मी असे खट्ट्याळ विनोद पाठवते’, असं सारा म्हणाली.
दरम्यान, खरंतर करीना, साराची दुसरी आई आहे. परंतु या दोघींमध्ये आई-मुलीच्या नात्यापेक्षा मैत्रीचं नात अधिक आहे. सैफने २०१२ मध्ये करीना कपूरसोबत लग्न केलं. त्यांना तैमुर नावाचा एक मुलगादेखील आहे. तर सारा सैफच्या पहिल्या पत्नीची मुलगी असून तिने २०१८ साली ‘केदारनाथ’ चित्रपटातून कलाविश्वात पदार्पण केलं. लवकरच तिचा ‘लव आजकल’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
click and follow Indiaherald WhatsApp channel