भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (इस्त्रोचे) प्रमुख डॉ. के. सिवन यांनी वर्षाच्या पहिल्याच दिवशी घोषणा केली की इस्त्रोचे दुसरे स्पेसपोर्ट (लाँच स्टेशन) हे तामिळनाडूच्या थूथुकुडी येथे बनेल. थूथुकुडीला स्पेसपोर्टसाठी निवडण्यामागे अनेक कारणे आहेत.

थूथुकुडी हे देशाच्या पुर्वेकडील भागात असलेले किनाऱ्यावरील शहर आहे. पृथ्वी पश्चिमेकडून पुर्वेच्या दिक्षेने फिरते त्यामुळे स्पेसपोर्ट नेहमी पुर्व दिशेलाच बनवले जाते. जेणेकरून रॉकेट लाँच केल्यानंतर इंधनाची बचत होईल. कारण हे पृथ्वीच्या गतीच्या दिशेने लाँच केले जाते. कोणतेही लाँच स्टेशन हे शहरापासून लांब बनवले जाते. जेणेकरून मानवी वस्ती अथवा शहराला नुकसान होऊ नये. जर रॉकेट लाँच केल्यानंतर भटकले अथवा त्याचा विस्फोट करावा लागला तर नुकसान होऊ नये यासाठी ही काळजी घेतली जाते.

 

रॉकेट लाँचिंग पडणार स्वस्त –

आतापर्यंत जेवढे पीएसएसव्ही रॉकेट पोलर ऑर्बिटमध्ये सोडण्यात आले आहेत, ते श्रीहरिकोटामधून निघाल्यानंतर श्रीलंकेच्या वरून जातात. थूथुकुडीमधून लाँचिंग केल्यावर 700 किमी अंतर कमी होईल यामध्ये इंधन वाचेल व 30 टक्के खर्च कमी होईल.

भूमध्य रेषेच्या जवळ –

थूथुकुडी हे भूमध्य रेषेच्या जवळ आहे. म्हणजेच लाँचिंगनंतर उपग्रहांना त्यांच्या कक्षेत पोहचण्यास पृथ्वीच्या जास्त फेऱ्या माराव्या लागणार नाहीत. यामुळे वेळ आणि इंधनाची बचत होईल.

 

रॉकेट बनते तेथून केवळ 100 किमी अंतरावर –

तामिळनाडूच्या तिरुनेलवेली जिल्ह्यातील महेंद्रगिरी येथे लिक्विड प्रोपल्शन सिस्टम सेंटर आहे. येथे पीएसएलव्ही रॉकेटचे दुसऱ्या आणि चौथ्या टप्प्यातील इंजिनचे निर्माण होते. हे श्रीहरिकोटापासून 700 किमी तर थूथुकुडीपासून केवळ 100 किमी अंतरावर आहे.

पीएसएलव्ही आणि एसएसएलव्ही रॉकेट सोडणार –

थूथुकुडी स्पेसपोर्टवरून केवळ पोलर ऑर्बिटमध्ये पाठवण्यात येणाऱ्या उपग्रहांचे लाँचिंग होईल. येथून दुसऱ्या देशांचे उपग्रह सोडले जातील. लाँचिंगसाठी पीएसएलव्ही आणि  एसएसएलव्ही रॉकेटचा वापर केला जाईल. हे स्पेसपोर्ट जवळपास 2300 एकरमध्ये बनेल. पुढील 6 महिन्यात याचे काम सुरू होईल व पुर्ण होण्यासाठी 4 ते 5 वर्ष लागतील.

 

थूथुकुडीलाच आधी तुतीकोरीन म्हटले जात असे. हे भारतातील प्रमुख बंदरांपैकी एक आहे. हे चैन्नईपासून 600 किमी आणि तिरुवनंतपुरमपासून 190 किमी लांब आहे.

या शहरात मोत्यांचा व्यापार होतो. येथे समुद्रात जाऊन लोक मोती शोधतात. येथील मोत्यांचा व्यापार बघून 1548 मध्ये पोर्तुगिजांनी हल्ला केला होता. या शहरात मिठांची देखील शेती होते. येथील मिठांची सर्वाधिक मागणी रासायनिक उद्योगांसाठी होते. दरवर्षी येथे 1.2 मिलियन टन मिठाचे उत्पादन होते.

 

మరింత సమాచారం తెలుసుకోండి: