पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि अष्टपैलू खेळाडू शाहिद आफ्रिदी हा पाचव्यांदा बाप झाला असून त्याला पाचवी मुलगी झाली आहे. त्याने आपल्या ट्विटरवर मुलींसह पाचव्या मुलीचा फोटो ट्विट केला. आपण आपल्याला पाचवी मुलगी झाल्याने आनंदी असल्याचे शाहिदने म्हटले आहे. पण त्याची सोशल मीडियावर चांगलीच फिरकी घेण्यात येते आहे. त्याला कुटुंब नियोजनाचा सल्ला अनेकांनी दिला आहे. तर अरे बायकोचा थोडासा विचार कर असाही खोचक सल्ला काहींनी दिला आहे.
त्याने ट्विट करताना अल्लाहच्या कृपेने आणि आशीर्वादाने मला चार मुली आहेत. आता पाचवीही मुलगी झाली आहे. मी तिचा फोटो शेअर करतो आहे. मला पाचवीही मुलगी झाल्याचा आनंद होतो आहे. ही बातमी मी माझ्या चाहत्यांना फोटोद्वारे देतो आहे. #FourbecomeFive असेही त्याने लिहिले आहे. तसेच शाहिदने आपल्या मुलींसोबतचा फोटो ट्विटरवर शेअर केला आहे.
५ हजारांवर रिट्विट्स १२ तासांपूर्वी पोस्ट केलेल्या या फोटोला मिळाले आहेत. तर ४० हजारांपेक्षा जास्त लाईक्सही आले आहेत. पण शाहिद आफ्रिदीला नेटकऱ्यांनी सल्ले देत त्याच्यावर टीका केली आहे. ट्विटर इंडियावरही Afrdi हा ट्रेंड चांगलाच होत आहे. शाहीद आफ्रिदी तुला क्रिकेट टीम तयार करायची आहे का? निरक्षर कुठला! बास्केटबॉलची टीम तर झाली आता क्रिकेटची टीम बनावयाची आहे का? तुला कुटुंब नियोजनाची गरज असल्याचे सल्ले देत आफ्रिदीला ट्विटरवर चांगलेच ट्रोल करण्यात आले आहे.
click and follow Indiaherald WhatsApp channel