काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांचे महाराष्ट्रातले ‘फेव्हरेट’ नेते नाना पटोले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. पटोले यांनी महाजनादेश यात्रेवरून मुख्यमंत्र्यांसह भाजपचा समाचार घेतला आहे. महाजनादेश यात्रेला उत्तर देण्यासाठी पटोले विदर्भात ‘फडवणीस पोलखोल’ यात्रा काढणार आहेत. विदर्भात जिथे मुख्यमंत्री गेले, तिथे जाऊन फडवणीस सरकारने जनतेची कशाप्रकारे फसवणूक केली, सांगणार असल्याचे पटोले यांनी सांगितले.
कोल्हापूर, सांगलीच्या पुरग्रस्तांसाठी राज्य सरकारने काढलेल्या अध्यादेशाबाबत पटोले यांनी अकोला येथे पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यावर खोचक टीका केली. दुसरा बाजीराव पेशवा आणि फडणवीस यांचे काम सारखेच, अशा शब्दात टोला लगावला. मुख्यमंत्री जसे वागतात, तसेच मंत्रिमंडळातील मंत्री वागतात. सेफ बोटमध्ये मंत्री फिरतात, असा आरोप पटोले यांनी केला.
एका बाजूला राज्यात अस्मानी आणि दुष्काळी संकट तर दुसर्या बाजूला मुख्यमंत्री महाजनादेश यात्रा करीत आहेत, अशी टीका पटोले यांनी केली. पटोले यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरच कडवी टीका करून भाजपची साथ सोडली. मोदी यांच्या कार्यपद्धतीवर जाहीर टीका करीत पटोले यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मोदी यांना प्रश्न विचारलेले आवडत नाहीत. मोदी सरकारला शेतकर्यांची किंमत नाही, अशी जाहीर टीका करत पटोले यांनी खळबळ उडवून दिली होती.
click and follow Indiaherald WhatsApp channel