मुंबई : मुंबईत दिवसभरात कोरोनाचे 510 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहे. दिवसेंदिवस वाढत असलेल्या रुग्णांमुळं मुंबईकरांच्या चिंतेत मोठी भर पडली आहे. आज मुंबईत कोरोनामुळं 18 जणांचा मृत्यू सुद्धा झाला आहे. त्यामुळं कोरोनाबाधित रुग्णांची संख्य आता 9 हजार 123 वर पोहचली आहे.

                   
महाराष्ट्राची आर्थिक राजधानी कोरोनामुळं मोठी संकटात सापडली आहे. आतापर्यंत मुंबईत 361 रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे. दरम्यान धारावीत आजच्या दिवशी कोरोनाचे 42 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहे.

                              

धारवीसारख्या झोपडपट्टीत कोरोनाचा शिरकाव होणं मोठी चिंतेची बाब आहे. दिवसेंदिवस सापडत असलेल्या रुग्णांमुळं धारावीत कोरोनाग्रस्तांची तपासणी करण्यास प्रशासनाने वेग वाढवला आहे. 
                                           


https://mobile.twitter.com/ANI/status/1257323426689105920?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1257323426689105920&ref_url=https%3A%2F%2Famnews.live%2F

మరింత సమాచారం తెలుసుకోండి: