फेसबुकच्या मालकीचे अ‍ॅप व्हॉट्सअ‍ॅपने भारतातील तरूण उद्योगपतींना प्रोत्साहन देण्यासाठी स्टार्टअप इकोसिस्टमध्ये 1.8 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याची मोठी घोषणा केली आहे. कंपनी ही गुंतवणूक फेसबूक अ‍ॅड क्रेडिट स्वरूपात करेल. व्हॉट्सअ‍ॅपचे म्हणणे आहे की, याद्वारे उद्योजक आपल्या ग्राहकांशी अधिक चांगल्या प्रकारे संवाद साधू शकतील व त्यांना उद्योग वाढवण्यास देखील मदत होईल.

 

या गुंतवणुकीद्वारे 500 स्टार्टअप्सची मदत केली जाईल. यामध्ये डिपार्टमेंट ऑफ इंडस्ट्रियल पॉलिसी अँन्ड प्रमोशनकडून पात्रता मिळालेले स्टार्टअप्स असतील. कंपनीचे म्हणणे आहे की, प्रत्येक स्टार्टअपला 500 डॉलर म्हणजेच 35,800 रुपये फेसबूक अ‍ॅड क्रेडिट स्वरूपात दिले जातील.

 

या क्रेडिटचा वापर करून स्टार्टअप्स जाहिरातींद्वारे ग्राहकांपर्यंत पोहचू शकतील. ग्राहक यावर क्लिक करून थेट व्हॉट्सअ‍ॅपद्वारे व्यापाऱ्याशी संवाद साधू शकतील. यामुळे ग्राहक आणि व्यापाऱ्यामध्ये एक नाते तयार होईल व वस्तूंच्या विक्रीमध्ये याचा फायदा होईल.

 

सध्या भारतात जवळपास 10 लाख व्यावसायिक ग्राहकांशी संपर्क ठेवण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅप बिझनेस अ‍ॅपचा वापर करत आहेत. जागतिक बाजारात 50 लाखापेक्षा अधिक  व्हॉट्सअ‍ॅप बिझनेस अ‍ॅपचा वापर केला जात आहे.

 

कंपनीची ही गुंतवणूक स्टार्टअप इंडिया- व्हॉट्सअ‍ॅप ग्रँड चॅलेंजचा देखील एक भाग आहे. यामध्ये जिंकणाऱ्याला 5 ग्रँड चॅलेंज विजेत्यांना व्हॉट्सअ‍ॅपकडून 35 लाख रुपयांचे अनुदान देण्यात येईल. मागील 3 वर्षात देशभरातील 19 हजारांपेक्षा अधिक स्टार्टअप्सनी सरकारच्या स्टार्टअप इंडिया प्रोग्राममध्ये रजिस्टरेशन केले आहे.

మరింత సమాచారం తెలుసుకోండి: