दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभास आणि बॉलीवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर यांचा बहुचर्चित ‘साहो’ हा चित्रपट आज (३० ऑगस्ट) रिलीज झाला आहे. चाहत्यांनी ड्रामा आणि जबरदस्त अॅक्शन सीन्सने भरलेला ‘साहो’ पाहण्यासाठी तुफान गर्दी केली असून चित्रपटाच्या तिकीटांच्या भरमसाठ मागणीमुळे चक्क दोन हजार रुपयांपेक्षा अधिक किंमतीला साहोचे एक तिकीट विकले जात आहे.
पण एवढे महाग तिकीट घेण्यासाठीसुद्धा चाहत्यांनी पहाटे चार वाजल्यापासूनच अक्षरश: पाच कोलोमीटर पर्यंतच्या रांगा लावल्याचे दिसून आले आहे.
बाहुबली फेम प्रभास आणि अभिनेत्री श्रद्धा कपूर यांची जुगलबंदी साहो या अॅक्शनपटात पहायला मिळणार आहे. निर्मात्यांनी ३५० कोटींच्या या बिग बजेट चित्रपटाच्या जाहिरातीवर कोट्यावधींचा खर्च केला, पण प्रभासची लोकप्रियताच चाहत्यांना सिनेमागृहांजवळ खेचत असल्याचे म्हटले जात आहे.
तामिळ, तेलुगु, मल्याळम व हिंदी या चार भाषांमध्ये हा चित्रपट रिलीज झाला आहे. अभिनेता प्रभासचा हा बाहुबलीच्या तुफान यशानंतर पहिलाच चित्रपट असल्यामुळे हा चित्रपट पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.
click and follow Indiaherald WhatsApp channel