पुणे : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सत्तास्थापनेनंतर पहिल्यांदाच बारामतीच्या दौऱ्यावर आहेत. गुरुवारी राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांना बारामतीला भेटणार आहेत. आज ही भेट होणार आहे. अॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टने आयोजित केलेल्या कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते केले जाणार आहे. अॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे संचालन पवार कुटुंबातर्फे केले जात असते.
महत्त्वाचे म्हणजे मुख्यमंत्री झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांचा हा पहिलाच बारामती दौरा आहे. या कार्यक्रमामध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचीही उपस्थिती असणार आहे. या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय बोलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. महाविकास आघाडीचे उपमुख्यमंत्री अजित पवार, तसेच खासदार सुप्रिया सुळे हेदेखील यावेळी उपस्थित राहतील.
बारामतीतील शारदानगर येथील कृषी विज्ञान केंद्रातील या कृषी प्रदर्शनाला आजपासून सुरूवात होईल. चार दिवस हे प्रदर्शन सुरू असणार आहे. अॅग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टचे प्रमुख राजेंद्र पवार यांनी आज बुधवारी पत्रपरिषदेमध्ये याविषयी माहिती दिली. 16 जानेवारीला सकाळी 9 वाजता या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात येणार आहे.
click and follow Indiaherald WhatsApp channel