भारताने कलम 370 हटवल्यानंतर पाकिस्तानने युद्धाची भाषा करायला सुरवात केली आहे. तर इम्रान खान सरकारच्या नेत्यांनी भारताला वारंवार पोकळ धमकी देण्याचा तडाखा लावला आहे. मात्र आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पाकिस्तानला ठणकावले आहे. आम्ही शांतीचे पुरस्कर्ते आहोत, परंतु आम्हाला छेडाल तर घरात घुसून मारण्यासही मागेपुढे पाहणार नाही, असा इशारा त्यांनी दिला आहे. गांधीनगरमधील पंडित दीन दयाल उपाध्याय पेट्रोलियम विश्वविद्यालयात ते बोलत होते.
यावेळी अमित शहा म्हणाले की, आम्ही शांतीचे पुरस्कर्ते आहोत, परंतु आम्हाला छेडाल तर घरात घुसून मारण्यासही मागेपुढे पाहणार नाही हे आम्ही जगाला दाखवून दिल्याचे गृहमंत्री . पुलवामा हल्ल्यानंतरही आम्ही पाकिस्तानमधील बालाकोटमध्ये घुसून कारवाई केली आणि सीमारेषांवर शस्त्रसंधीचे उल्लंघन करणाऱ्यांना आणि हिंसाचार करणाऱ्यांना चाप घातल्याचे शहा म्हणाले. तसेच देशाच्या सुरक्षेबाबत कोणतीही तडजोड करणार नाही, हे देखील ते ठासून म्हणाले.
click and follow Indiaherald WhatsApp channel