मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे तसेच राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांची निवडणूक प्रतिज्ञापत्रांची पडताळणी करण्याची विनंती निवडणूक आयोगाने सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेसकडे केल्याची माहिती आहे.

प्रतिज्ञापत्रात खोटी माहिती दिल्याची तक्रार एका माहिती अधिकार कार्यकर्त्याने निवडणूक आयोगाकडे केली आहे. यापार्श्वभूमीवर ही विनंती करण्यात आल्याचं कळतंय.

यासंदर्भात महिनाभरापूर्वी निवडणूक आयोगाकडे तक्रार आली होती. याबाबत एक स्मरणपत्रही पाठवण्यात आलं होतं, असं आयोगाच्या एका अधिकाऱ्याने सांगितलं आहे.

दरम्यान, ज्या उमेदवारांविरोधात प्रतिज्ञापत्रांमध्ये चुकीची माहिती दिल्याच्या तक्रारी येतील त्यांची निवडणूक आयोगाकडून दखल घेतली जाईल, असं आयोगाने म्हटलं होतं.         

మరింత సమాచారం తెలుసుకోండి: