मुंबई : कोहिनूर मिल कर्ज प्रकरणी मनसेप्रमुख राज ठाकरे यांची आज ईडीच्या कार्यालयात चौकशी सुरु आहे. यावेळी ईडीच्या कार्यालयात जाण्यासाठी राज ठाकरे सहकुटुंब रवाना झाले. यावेळी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी राज ठाकरे सहकुटुंब सहपरिवार ईडीच्या चौकशीला निघाले आहेत का सत्यनारायणाच्या पूजेला?, असा सवाल दमानिया यांनी केला. यावर राज यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी भावनिक प्रतिक्रिया दिली आहे.
शर्मिला ठाकरे म्हणाल्या कि, मी राज ठाकरे यांची पत्नी आहे. त्यामुळे ईडीच्या चौकशीतच काय सात जन्म त्यांच्यासोबत आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
दरम्यान, राज ठाकरेंची ईडी कार्यालयात चौकशी सुरु असून त्यांची चौकशी संपेपर्यंत त्यांचे कुटुंबिय ईडी कार्यालयाजवळच असलेल्या ‘ग्रँड’ हॉटेलमध्ये थांबणार आहेत.
click and follow Indiaherald WhatsApp channel