इस्लामाबाद: पंतप्रधान मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची भेट घेतल्यावर काश्मीर प्रश्न हा आमचा अंतर्गत प्रश्न असल्याने मध्यस्थीचा प्रश्न येताच नाही असे सांगितले आहे. हामूद्दा पाकिस्तान ला चांगलाच झोंबला असून पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पत्रकार परिषद घेतली असून , ते म्हणाले की, काश्मीर मुद्दा आंतरराष्ट्रीय पातळीवर नेण्यात आम्ही यशस्वी झालो आहोत. आता पुढच्या महिन्यात हा मुद्दा जागतिक स्तरावर UNGAमध्ये उपस्थित करणार आहोत.

तसेच काश्मीरमुद्यावर आम्ही काहीही करण्यास तयार असून दोन्ही देशांकडे आण्विक शक्ती आहेत. त्याचा वापर केल्यास जगात हाहाकार माजेल असे म्हणत अप्रत्यक्षरित्या अण्वस्त्र हल्ल्याची धमकीच दिल्याचे बोलले जात आहे. तसेच भारत पुन्हा बालाकोटसारखे हल्ले करू शकणार नाही. जोपर्यंत काश्मीर स्वतंत्र होत नाही, तोपर्यंत काश्मीरचा मुद्दा आम्ही लावून धरू, असंही  खान यांनी म्हटले आहे.

जगातील सर्व मुख्य देशांशी आम्ही या मुद्द्यावरून चर्चा केली आहे. संयुक्त राष्ट्रातही १९६५ नंतर पहिल्यांदाच काश्मीर मुद्द्यावर चर्चा झाली आहे. मी दोन्ही देशांमध्ये शांती नांदावी यासाठी प्रयत्नशील आहे.                                                                                            

మరింత సమాచారం తెలుసుకోండి: