विधानसभा निवडणुका आता जाहीर झाल्या आहेत. त्यामुळे प्रत्येक उमेदवाराने मतदारसंघात प्रचाराला सुरवात केली आहे. सभा – बैठका घेऊन उमेदवार मतदारांना आपल्या बाजूने घेण्याचा प्रयत्न करत आहेत. तर काही उमेदवार घरोघरी जाऊन आपला आणि पक्षाचा प्रचार करत आहेत.

असाच फंडा वापरत नुकतेच भाजपात आलेले माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूर मतदारसंघात जोरदार प्रचाराला सुरवात केली आहे. घरोघरी जाऊन ते प्रचार करतचं आहेत, शिवाय ‘चाय पे चर्चा’ या नागरी उपक्रमात देखील सहभागी होऊन मतदारांशी संवाद साधत आहेत.

आज हर्षवर्धन पाटील यांनी फेसबुकवर याच संदर्भात पोस्ट टाकली आहे. चहा म्हणजे आपल्या संस्कृतीत आदर सत्कार करण्यास वापरला जातो. देशाच्या पंतप्रधानांचा भूतकाळ चहावाला असाच होता. सर्वसामान्य लोकांचे नेतृत्व म्हणून आज आपण त्यांना बघतो. सहज आज आमच्या चहावाल्याला भेट दिली, असा आशय त्यांनी यावर लिहिला आहे.

दरम्यान विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात हर्षवर्धन पाटील यंदा भाजपचा झेंडा घेवून उतरणार आहेत. कॉंग्रेस आघाडीच्या फसव्या राजकारणाला कंटाळून हर्षवर्धन पाटील हे भाजपवासी झाले आहेत. त्यामुळे हर्षवर्धन पाटील यांनी मतदारसंघात जोरदार मोर्चेबांधणी करत विरोधकांना मोठे आव्हान उभे केले आहे. तसेच २०१४च्या निवडणुकीला हर्षवर्धन पाटील यांचा पराभव झाला होता. तर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या दत्ता भरणे यांनी बाजी मारली होती.                                                                 

మరింత సమాచారం తెలుసుకోండి: