महाविकास आघाडीचं सरकार जास्त काळ टिकणार नाही. कारण आघाडीतील तिन्ही पक्षांमध्ये ताळमेळ नाही, अशी टीका विरोधक करत आहेत. याच पार्श्वभूमीवर संजय राऊतांना विचारलं असता त्यांनी महाविकास आघाडी सरकार बाबत विश्वास व्यक्त केला. ते एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना बोलत होते.

 

यावेळी बोलताना राऊत यांनी महाविकास आघाडी सरकारबाबत भाष्य केलं. ते म्हणाले की, ‘नव्या सरकारमध्ये शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांकडे सत्तेचा रिमोट आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचं सरकार पडणार नाही आणि कोणी पाडणारही नाही, असे ते म्हणाले. पुढे बोलताना राऊत म्हणाले, हे सरकार पाच वर्ष नक्की टिकेल.

 

गेल्या पाच वर्षात फडणवीस सरकारने लोकांची दिशाभूल केली. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस शिवसेनेची साथ सोडणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. दरम्यान, विधानसभा निवडणूक महायुती म्हणजेच भाजप – शिवसेनेने एकत्र लढवली. मात्र मुख्यमंत्री पदावरून भाजप – सेनेची युती तुटली. आणि त्यानंतर शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस मिळून महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले.                                                                                       

మరింత సమాచారం తెలుసుకోండి: