मोबाईल कंपनी हॉनरने आज भारतात 3 नवीन प्रोडक्ट्स लाँच केले आहेत. हॉनर 9एक्स स्मार्टफोनसह कंपनीने मॅजिक वॉच 2 आणि हॉनर बँड 5आय देखील लाँच केले आहेत.
हॉनर 9एक्स स्मार्टफोनची किंमत 12,999 रुपये ठेवण्यात आलेली आहे. यामध्ये 4 जीबी रॅम + 128 जीबी इंटर्नल स्टोरेज मिळेल. या फोनची खरी किंमत 13,999 असून, लिमिटेड पिरियड ऑफर अंतर्गत यावर सूट मिळत आहे. या फोनच्या 6 जीबी + 128 जीबी इंटर्नल स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 16,999 रुपये आहे.
या फोनमध्ये इनहाउस प्रोसेसर HiSilicon Kirin 710F मिळेल. फोनमध्ये 6.59 इंच फूल एचडी डिस्प्ले देण्यात आला आहे. कॅमेऱ्याबद्दल सांगायचे तर यात ड्युअल रिअर कॅमेरा मिळेल. याचा प्रायमेरी सेंसरी कॅमेरा 48 मेगापिक्सल व दुसरा कॅमेरा 2 मेगापिक्सल आहे. सेल्फीसाठी यात 16 मेगापिक्सल मोटराइज्ड पॉप अप कॅमेरा मिळेल.
हॉनर 9एक्स स्मार्टफोनमध्ये रिअर पॅनेलला फिंगरप्रिंट स्कॅनर मिळेल. यात ड्युअल सिम सपोर्ट करेल. कनेक्टिव्हिटीसाठी यात यूएसबी टाइप सी मिळेल. याशिवाय वाय-फाय, ब्लूटूथ यासारखे स्टँडर्ड फीचर्स देखील मिळतील. फोनमध्ये 4000 एमएएच बॅटरी देण्यात आलेली आहे.

click and follow Indiaherald WhatsApp channel