चीनसह जगभरातील अनेक देशांमध्ये कोरोना व्हायरसने हाहाकार माजवला असून कोरोनामुळे हजारो नागरिकांनी आपले प्राण गमावले आहेत. कोरोना व्हायरसमुळे सर्वसामान्य जनते बरोबरच सेलिब्रिटी देखील चिंता व्यक्त करत आहेत. त्यातच काही दिवसांपूर्वी सोशल मीडियात अशी चर्चा होती की प्रसिद्ध अभिनेते जॅकी चॅग यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे.
पण या केवळ फक्त अफवा असल्याचे आता समोर आले आहे. या सर्व अफवांना खुद्द जॅकी चॅग यांनी इन्स्टाग्रामच्या माध्यमातून पूर्णविराम दिला आहे. मी पूर्णपणे स्वास्थ्य असल्याचे त्यांनी सांगितले आहे. इन्स्टाग्रामवर स्मितहास्य केलेला फोटो पोस्ट करत त्यांनी चाहत्यांना ही माहिती दिली.
माझी तुम्हा सर्वांना एक विनंती आहे. बिलकूल घाबरू नका. मी आता क्वैरेंटाईनमध्ये नाही. आशा करतो तुम्ही देखील स्वास्थ्य असाल.’ असे कॅप्शन देत त्यांनी स्वत:चा फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट करत लिहिले आहे. त्यांच्या काही चाहत्यांनी काही दिवसांपूर्वी त्यांच्यासाठी मास्क भेट म्हणून पाठवले होते. त्यांनी ज्यासाठी चाहत्यांचे आभार देखील मानले. ते म्हणाले मला या कठीण समयी जगभरातून अनेक भेट वस्तू आल्या आहेत. माझ्या सहकाऱ्यांना मी सांगितले की कोणत्याही अधिकृत संस्थांद्वारे या भेटवस्तू गरजू लोकांपर्यंत पोहोचवा.
click and follow Indiaherald WhatsApp channel