पुणे – 2015-16 ते 2019-20 या कालावधीत केवळ दूरचित्रवाणी व रेडिओवरील जाहिरातींसाठी देवेंद्र फडणवीसच्या यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने 15 कोटी 28 लाख रुपये खर्च केला आहे. नोव्हेंबर 2019 नंतरचा काळ यामध्ये वगळला, तर भाजप सरकारच्या काळातील हा सर्व खर्च आहे. जाहिरातींवर दररोज सरासरी 85 हजार रुपयांचा खर्च झाल्याचे माहिती अधिकारातून उघड झाले आहे.
माहिती अधिकारात बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगर येथील नितीन यादव यांनी ही माहिती मागवली होती. त्यात काही तपशील उघडकीस आले आहेत. 2017-18 साली टीव्ही वाहिन्यांवरील जाहिरातींवर फडणवीस सरकारने तब्बल 5 कोटी 99 लाख 97 हजार 520 रुपये खर्च केले असल्याची माहिती मिळाली आहे, तर याच वर्षी रेडिओ जाहिरातींवर 1 कोटी 20 लाख 69 हजार 877 रुपयांचा खर्च केला आहे.
रेडिओ वाहिन्यांवर फडणवीस सरकारच्या काळात जाहिरातीवर केलेला खर्च 2013-2014 साली 59 लाख 96 हजार 291 रुपये एवढा होता. तो वाढून 2018-2019 साली 1 कोटी 85 लाख 72 हजार 887 झाल्याचे दिसत आहे, तर 2013-2014 साली टीव्ही वाहिन्यांवर जाहिरातीसाठी केलेला खर्च 53 लाख 25 हजार 730 रुपये होता, तो 2018-2019 साली वाढून तब्बल 2 कोटी 84 लाख 48 हजार 317 रुपये झाल्याची माहिती या माहिती अधिकारातून मिळाली आहे.

click and follow Indiaherald WhatsApp channel