राहुल गांधी म्हणतात आमची सत्ता असती तर 15 मिनिटात चीनला बाहेर फेकले असत. चीन चं राहू द्या तुमची सत्ता महाराष्ट्रात आहे, आधी एक काम करा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला घराच्या बाहेर काढून दाखवा, असं निलेश राणे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, निलेश राणेंच्या या टीकेवर महाराष्ट्र काँग्रेसतर्फे काय प्रत्युत्तर येत हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. दरम्यान, निलेश राणेंनी १५ मिनिटांत चीनला बाहेर फेकले असते, असे म्हणणाऱ्या राहुल गांधींचा इतिहास कच्चा असल्याचा टोला लगावला.
राहुल गांधींचा इतिहास कच्चा आहे, जेव्हा काँग्रेसचे ए के अँटनी संरक्षणमंत्री होते तेव्हा चीनने भारताच्या काही भागांमध्ये घुसखोरी केली होती. पण “आमची चर्चा सुरू आहे”, असे उत्तर एके अँटनींनी हसत दिले, पण चीनने घुसखोरी केलेला भाग तेव्हा भारताला मिळाला नाही.
click and follow Indiaherald WhatsApp channel