स्टिव्ह जॉब्स आणि स्टिव्ह व्होजनियाक यांनी 1976 मध्ये अॅपल कंपनीची कॅलिफोर्निया येथे स्थापना केली. याच वर्षी दोघांनी पहिला रेअर फुली फंक्शनल अॅपल-1 कॉम्प्युटर बनवला होता. या पहिल्या वहिल्या अॅपलचा या आठवड्यात बोस्टन येथे लिलाव होणार आहे. लिलावासाठी सुरूवाती किंमत 3 कोटी 39 लाख रुपये (458,711 डॉलर) ठेवण्यात आली आहे.
कंपनीचे हे पहिलेच उत्पादन होते, जे अॅपल नावाने विकसित करण्यात आले होते. हे कंपनीच्या थिंक डिफरेंट अभियानाचा भाग होते. लिलावात डिझाइन इंजिनिअर जॅरी मॅनॉक यांच्या जीवनकाळातील संग्रहाची देखील विक्री होईल. या लिलावात अॅपलच्या संपुर्ण काळातील उत्पादनांना ठेवण्यात आले आहे. यात स्टिव्ह जॉब्स यांची स्वाक्षरी असलेले पॉवरबुक, निऑन अॅपल लोगो देखील आहेत.
आरआर ऑक्शनचे एग्झिक्युटिव्ह व्हीपी बॉबी लिव्हिंगस्टन यांच्यानुसार, सुरूवातीला या कॉम्प्युटरचे 200 यूनिट डिझाईन करण्यात आले होते. यातील 175 यूनिटची विक्री करण्यात आली होती तर 25 बाकी होते. 1976 मध्ये या कॉम्प्युटरची किंमत 666.66 डॉलर होती. या आधी दोन वर्षांपुर्वी अॅपल-1 कॉम्प्युटरला अमेरिकेच्या एका उद्योगपतीने लिलावात 3,75,000 डॉलरला खरेदी केले होते.
click and follow Indiaherald WhatsApp channel