भारत विरुद्ध श्रीलंका संघात तिसरा आणि शेवटचा टी20 सामना महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडीयम, गहुंजे येथे पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने श्रीलंका संघाला 78 धावांनी पराभूत केले आणि मालिका 2-0 अशी खिशात घातली.

 

या मालिकेनंतर आयसीसीने टी20 क्रमवारी जाहीर केली आहे. यामध्ये फलंदाजांच्या क्रमवारीत भारताचा कर्णधार विराट कोहलीला एका स्थानाचा फायदा  झाला आहे. त्यामुळे तो आता 10 क्रमांकावरुन 9 व्या क्रमांकावर आला आहे.

 

तसेच गोलंदाजांच्या क्रमवारीत वेगवान गोलंदाज नवदीप सैनीने 146 स्थानाची झेप घेतली. तो आता 98 व्या क्रमांकावर आला आहे. त्याने श्रीलंकेविरुद्ध पार पडलेल्या टी20 मालिकेत 2 सामन्यात 5 विकेट्स घेतल्या आहेत. विराटव्यतिरिक्त फलंदाजी क्रमवारीत शिखर धवन 15व्या स्थानावर आला आहे. मनीष पांडे 4 स्थानांची प्रगती करत 70व्या स्थानावर पोहचला आहे. तसेच सलामीवीर फलंदाज केएल राहुल 6 व्या क्रमांकावर कायम आहे.

 

गोलंदाजी क्रमवारीत पहिल्या 10 खेळाडूंमध्ये एकाही भारतीय खेळाडूचा समावेश नाही. गोलंदाजांमध्ये सैनीव्यतिरिक्त दुखापती मधून पुनरागमन करणाऱ्या जसप्रीत बुमराहला 8 स्थानांचा फायदा झाला आहे. तो आता 39व्या स्थानावर आ

మరింత సమాచారం తెలుసుకోండి: