निर्भया बलात्कार प्रकरणातील दोषींना उद्या फाशी दिली जाणार असून न्यायालयात दोषी पवन गुप्ताने याचिका दाखल केली होती. पवनने आपल्या याचिकेत घटना घडली तेव्हा अल्पवयीन असल्याचा दावा केला होता. यासंबधीची याचिका आधीच फेटाळण्यात आली आहे. पण, आता त्याने नव्याने याचिका दाखल केली आहे.
न्यायाधीश भानुमती, अशोक भूषण आणि ए. एस बोपन्ना यांच्या पीठाने आधी दाखल केलेली याचिका रद्दबातल ठरवली होती. पवन गुप्ताचे वकील ए. पी. सिंह यांनी यावर पुन्हा फेरविचार याचिका दाखल केली आहे. सिंह यांनी याचिक दाखल केल्याचा वृत्ताला दुजोरा दिला आहे.
गुन्हा घडला तेव्हा दिल्लीमध्ये नसल्याचा दावा मुकेश सिंहने याचिकेत केला होता. मात्र, न्यायालयाने त्याची याचिका काल फेटाळली. कनिष्ठ न्यायालयाने दिलेल्या निर्णय सदोष असून यामध्ये कोणतीही अनियमितता नसल्याचे उच्च न्यायालयाचे न्यायाधीश ब्रिजेश सेठी यांनी मत नोंदविले. त्याचबरोबर कालच राष्ट्रीय मानवधिकार आयोगानेही दोषींची याचिका फेटाळून लावली होती. त्यामुळे आता येत्या २० तारखेला या चौघांची फाशी निश्चित मानली जात आहे.
कायदेशीर मार्गांचा वापर करत आतापर्यंत ३ वेळा निर्भया प्रकरणातील दोषींनी डेथ वॉरंट रद्द केल्यामुळे प्रत्येक वेळी दोषींची फाशी पुढे ढकलण्यात आली आहे. आता उद्या आरोपींना फाशी देणे नियोजित आहे.
click and follow Indiaherald WhatsApp channel