राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय पक्ष चांगलेच सक्रीय झालेले आहेत. याच पार्श्वभूमीवर नेते आणि कार्यकर्ते वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन मोर्चेबांधणी करताना दिसत आहेत. अशातच राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मोदी सरकारच्या वाढत्या दडपशाहीमुळे जनताही मतं मांडू शकत नाही असे व्यक्तव्य करत मोदी सरकारवर त्यांनी टिका केली आहे. पंढरपूर येथे सवांद संवाद दौराच्या निमित्ताने त्या प्रसार माध्यमांशी बोलत होत्या.

त्या पुढे बोलताना म्हणाल्या ३७० कलम रद्द करायच्या आधी सरकारने काही नेत्यांना विश्वसात घायला पाहिजे होते. पण सरकाने त्यांना विश्वासात न घेता कुठे ठेवले होते हे आम्हाला कोणालाच माहिती नाही. हे दुर्देव्य आहे की सरकार नवीन कायदे करताना सारखा दडपशाहीचा उपयोग करत आहे. त्यामुळे मोकळा श्वास घायला किंवा मत मांडायला लोकही घाबरत आहेत, असे विधान त्यांनी केले.

दरम्यान सुप्रिया सुळे संवाद दौऱ्याला काल पासून सुरवात झाली असून त्या राज्यातील पूर परिस्थिती, दुष्काळ, बेरोजगारी, महिला सुरक्षा, ढिसाळ कारभार याचा आढावा घेणार आहेत. संवाद दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात त्या अहमदनगर, सोलापूर, जळगाव, नाशिक, ठाणे, नागपूर, नवी मुंबई या जिल्ह्यात सुप्रिया सुळे संवाद दौरा करणार आहेत.                                                                              

మరింత సమాచారం తెలుసుకోండి: