वनप्लस ८ आणि ८ प्रो हे स्मार्टफोन गिकबेंचवर स्पॉट झाले आहेत. या फोन संदर्भात अनेक लिक्स समोर आले असले तरी अमेझॉन इंडियाच्या ऑफीशिअल पेजवर सुद्धा हा फोन स्पॉट झाला असून त्याचा अर्थ ग्लोबल लाँचिंगच्या वेळीच हा फोन भारतात लाँच केला जाईल असा आहे. गिकबेंचवर गॅलिली आयएन २०२५ या कोडनेमने हा फोन स्पॉट झाला आहे.
गिकबेंच वर फोनची स्पेसिफिकेशन्स दिली गेली आहेत. त्यानुसार हा फोन अँड्राईड १० ओएसवर रन करेल आणि त्याला स्नॅपड्रॅगन ८६५ चीपसेट दिला जाईल. १२ जीबी रॅम असलेला हा फोन मार्च किंवा एप्रिल मध्ये लाँच केला जाईल. वन प्लस ८ प्रो मध्ये क्वाड कॅमेरा सेट दिसतो आहे. त्यात ६४ एमपीचा सोनीचा प्रायमरी कॅमेरा, २० एमपी अल्ट्रा वाईड लेन्स, १२ एमपी टेलीफोटो लेन्स व थ्रीडी टीओएफ सेन्सर असेल. कॅमेरा सेट अप एलइडी फ्लॅश सह असेल आणि सेल्फी साठी ३२ एमपीचा कॅमेरा असेल. या फोनचा स्क्रीन खास असून ६.६५ इंची कर्व एज फ्लूईड एमोलेद पंचहोल डिस्प्ले या फोनला दिला जात आहे.
click and follow Indiaherald WhatsApp channel