पुढील महिन्यात भारत विरुद्ध वेस्ट इंडीज संघात 3 टी20 आणि 3 वनडे सामन्यांची मालिका होणार आहे. पण या मालिका सुरु होण्याआधीच भारताचा सलामीवीर फलंदाज शिखर धवन दुखापतग्रस्त झाल्याने भारताला मोठा धक्का बसला आहे.

 

धवन दुखापतीमुळे वेस्ट इंडीज विरुद्ध 6 डिसेंबरपासून सुरु होणाऱ्या टी20 मालिकेतून बाहेर पडला आहे. त्याच्याऐवजी आता टी20 मालिकेसाठी भारतीय संघात युवा यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसनला संधी देण्यात आली आहे.

 

धवनला सय्यद मुश्ताक अली करंडक स्पर्धेत महाराष्ट्र विरुद्ध सुरतमध्ये खेळत असताना डाव्या गुडघ्यावर खोल जखम झाली आहे. त्याच्या या दुखापतीचा आढावा बीसीसीआयच्या वैद्यकीय टीमने मंगळवारी घेतला आहे. त्यानंतर बीसीसीआयच्या वैद्यकीय टीमने धवनची जखम बरी होण्यास अजून काही काळ लागेल, असे सुचवले आहे.

 

धवन ऐवजी भारताच्या टी20 संघात निवड झालेला सॅमसन याआधीही बांगलादेश विरुद्ध झालेल्या टी20 मालिकेत भारतीय संघाचा भाग होता. मात्र त्याला या मालिकेतील एकाही सामन्यात खेळवण्यात आले नव्हते. सॅमसनने याआधी भारतीय संघाकडून केवळ एक टी20 सामना खेळला आहे. त्याने हा सामना 19 जुलै 2015 ला झिम्बाब्वे विरुद्ध खेळला होता.

మరింత సమాచారం తెలుసుకోండి: