रिअलमीने स्मार्टफोन क्षेत्रात अन्य नामवंत कंपन्यांना चांगली टक्कर देऊन स्वतःचे खास स्थान निर्माण केल्यानंतर आता नवीन सिरीज लाँच करत असल्याचे संकेत दिले आहेत, नार्झो या नावाने ही नवी स्मार्टफोन सिरीज असेल. त्याचा टीझर बुधवारी रिलीज करण्यात आला आहे.
विशेष म्हणजे या टीझरवरून सुरवातीला ही फॅशन रेंज असावी असा अंदाज केला गेला होता. पण त्यानंतर ही एकदम नवी स्मार्टफोन रेंज असल्याचे संकेत मिळाले आहेत. हे स्मार्टफोन कधी लाँच केले जाणार याबाबत काहीही सांगितले गेलेले नसले तरी हे स्मार्टफोन मिडरेंज, युवा पिढीला नजरेसमोर ठेऊन बनविले गेल्याचे सांगितले जात आहे. भारतात अगोदरच कंपनीने रिअलमी प्रो, एक्स, यु आणि सी सिरीज आणल्या आहेत.
रियलमी च्या या टीझरने ग्राहकवर्गाची उत्सुकता नक्कीच चाळविली गेली आहे. रीअलमीची ६ सिरीज नुकतीच भारतीय बाजारात आली असून तिला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. भारतीय स्मार्ट फोन बाजारात रोज नवे आव्हान स्मार्टफोन कंपन्यांना पेलावे लागत असून या बाजारात टिकण्यासाठी कंपन्या सतत प्रयत्नशील आहेत हे रियलमीच्या नव्या टीझर वरून दिसून आले आहे.
click and follow Indiaherald WhatsApp channel