कोरफडीत आरोग्यासाठी लागणारे अनेक गुणधर्म आहेत. कोरफडीत भरपूर औषधी गुणधर्म आहेत. या भरपूर प्रमाणात पोषक व्हीटॅमिन अ, आणि व्हीटॅमिन ब याचे प्रमाण चांगले आढळतात. त्यामुळे ते आपल्या आरोग्यासाठी अत्यंत उपयोगी ठरतात. बहुतेक  अनेक पोटांच्या आजारांवर कोरफडचा खूप फायदा होतो. पोटाच्या आजारांसाठी दररोज कोरफडचा रस नियमित गरम पाण्यात घ्या.

कोरफडमध्ये असणाऱ्या गुणधर्मामुळे सर्दी, खोकला, दमा, सायनस या प्रकारच्या श्वसनाच्या आजारांवर उपयुक्त ठरते. श्वसनाचे आजार होत असतील तर कोरफडीच्या रसात मध घालून दिवसातून दोन वेळ घेतल्याने फायदा होतो.

कोरफडीचा ताजा रस मलावरोध, अपचन, मूळव्याधी अशा पचनसंस्थेच्या आजारांवर गुणकारी ठरतो. नियमित कोरफडीचा ताजा रस घेतल्यास वजन कमी होण्यास मदत होते. रात्री मोबाईल च्या वापरणे डोळे दुखतात यासाठी कोरफडीचा रस पाण्यात टाकून या पाण्याने डोळे धुतल्यास डोळ्यांना आराम मिळतो.

तसेच जर डोळे आले असतील तर कोरफडीचा ताजा रस डोळ्याला लावल्याने सुद्धा आराम मिळतो. डोळे लवकर बरे होण्यास मदत होते. कोरफडीच्या असलेल्या गुणधर्मामुळे ते रक्तातून विषारी घटक काढून टाकण्यास मदत करते त्यामुळे रक्त शुद्ध होते. यामुळे अनेक प्रकारचे त्वचा विकार आणि रक्त विकार कमी होण्यास मदत होते.


మరింత సమాచారం తెలుసుకోండి: