महाविकास आघाडीने लवकरात लवकर शिवस्मारकाचे काम मार्गी लावण्यास पाउले उचलावीत, काँग्रेस राष्ट्रवादीकडून मला अपेक्षा नाही पण उद्धव ठाकरेंनी शिवस्मारकाचा प्रश्न मार्गी लावावा असे आवाहन शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी केले आहे.
शिवस्मारकाचे काम मार्गी लावण्यास सरकारने पाऊले उचलावीत, "शिवाजी महाराजांना विरोध करणाऱ्या औलादी महाराष्ट्रात जन्मल्या. त्यांनी शिवस्मारकाला विरोध केला. सरकारने याबाबत सर्वोच्च न्यायालयात लवकर भूमिका मांडावी. काँग्रेस राष्ट्रवादीकडून मला जास्त काही अपेक्षित नाही. पण, उद्धव ठाकरे यांनी पुढाकार घ्यावा.
शिवस्मारकाचा आढावा घेत स्मारकाचा प्रश्न मार्गी लावावा. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर घेऊन स्मारकाच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला होता. आता काँग्रेस – राष्ट्रवादीने स्मारकाच्या कामाची चौकशी करत स्मारकाचे काम मार्गी लावावे. असे विनायक मेटे म्हणाले आहेत.
दरम्यान, महाविकास आघाडी सरकारने जुन्या विकास कामांना रद्द करणे चुकीचे असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. लोकांच्या खेड्यापाड्यांच्या विकासाला कात्री लावणे चुकीचे आहे. महाविकास आघाडीच्या सरकारने मेट्रो कारशेडसारखे प्रकल्प रद्द केले आहेत. त्याबाबत बोलताना उद्धव ठाकरे यांनी आपणही सरकार मध्ये होतो हे लक्षात घ्यावे, असा टोला मेटे यांनी लगावला.
click and follow Indiaherald WhatsApp channel