बॉलिवूडची क्विन अर्थात अभिनेत्री कंगना राणावत पुन्हा एकदा ‘पंगा’ या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येण्सास सज्ज झाली आहे. काही दिवसांपूर्वीच चित्रपटाच्या फर्स्ट लूकनंतर नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे.
या चित्रपटात कंगना कबड्डीपटुच्या भूमिकेत दिसणार आहे. एकेकाळी कब्बडी चॅम्पियन असलेली महिला लग्न झाल्यानंतर घर-संसारात रमलेली असते. पण तिला अचानक पुन्हा तिच्या अस्तित्वाची जाणीव होते. तिला यासाठी तिचा पती आणि मुलाचीही साथ लाभते. देशासाठी ती वयाच्या ३२ व्या वर्षी पुन्हा कब्बडी खेळण्यासाठी सज्ज होते. ‘पंगा’च्या माध्यमातून तिचा हा प्रवास मोठ्या पडद्यावर उलगडणार आहे.
या चित्रपटात कौटुंबिक जबाबदारी आणि खेळाबद्दलचे प्रेम यांच्यामध्ये अडकलेल्या महिलेची कथा दाखवण्यात येणार आहे. यामध्ये कंगना ‘जया’च्या भूमिकेत दिसणार आहे. जस्सी गील हा तिच्या पतीच्या भूमिकेत तर नीना गुप्ता तिच्या आईच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. चित्रपटात अभिनेत्री रिचा चढ्ढाचीही महत्वपूर्ण भूमिका यामध्ये पाहायला मिळणार आहे.
ती कंगनाच्या प्रशिक्षकाच्या भूमिकेत दिसेल. या चित्रपटाचे दिग्दर्शन अश्विनी अय्यर तिवारी यांनी केले आहे. तर, फॉक्स स्टार स्टूडिओज अंतर्गत या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. पुढच्या वर्षी २४ जानेवारीला हा चित्रपट रिलीज होणार आहे.
click and follow Indiaherald WhatsApp channel