पुणे : मराठी अभिनेत्री मानसी नाईकसोबत छेडछाड झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी मानसी नाईककडून मुंबईतील साकीनाका स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मानसी पुण्यात कार्यक्रम सादर करण्यासाठी गेली होती. त्यावेळी तिच्यासोबत छेडछाड झाल्याची घटना घडली आहे.
मानासी नाईक 5 फेब्रुवारीला शिरूर तालुक्यातील रांजणगाव येथे संध्याकाळी वाढदिवसाच्या कार्यक्रमात परफॉर्मेंस करत होती. यावेळी एका अज्ञात व्यक्तीने तिच्याशी गैरकृत्य केले. याप्रकरणी मानसी नाईककडून तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. साकीनाका पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला. तर पुढील तपासासाठी रांजणगाव पोलिसांकडे गुन्हा वर्ग करण्यात आला आहे.
click and follow Indiaherald WhatsApp channel