जय भगवान गोयल यांच्या ‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ या पुस्तकावरून पेटलेले राजकारण आता एका वेगळ्याच वळणावर गेलेले बघायला मिळत आहे.आज सकाळीच उदयनराजेंनी पत्रकार परिषद घेऊन शरद पवारांना जाणता राजा हे ब्रीद वापरण्याबद्दल आक्षेप घेतला होता.

 

त्यावर जितेंद्र आव्हाडांनी उदयन राजेंना लक्ष करत बरंच काहीकाही सुनावलं होत.आता नुकत्याच एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी म्हटले की ‘उदयन राजेंवर जोवर पवारांचा हात होता तर निवडून आले, हात काढला तर पडले त्यामुळे उदयन राजे हे भावनेच्या भरात काहीतरीच बोलत आहेत.

 

जगभरात जाणते राजे हे फक्त शिवाजी महाराजच आहेत, अन्य कोणी नाही,जाणता राजा उपमा देताना शिवाजी महाराजांनी त्या काळात काय केलं ते पाहावं, महाराजांनी कार्यपद्धतीने जगाला आपलं कर्तृत्व दाखवून दिलं. स्वतःला जाणता राजा म्हणून घेण्याचा दुसरा कोणाचा अधिकार नाही. सो कॉल्ड जाणते राजे कोणी त्यांना उपमा दिली माहिती नाही.

 

कोणताही पक्ष असला तरी सोयीप्रमाणे सर्वजण छत्रपती शिवरायांचं नाव का घेता. त्यांचं आचरण केलं असतं तर ही परिस्थिती आली नसती. हे तुम्ही लोकांनी निवडून दिलेले लोकशाहीतले जाणते राजे म्हणे. राज्याच्या खेळखंडोबा केलाय, किळस वाटते. असं म्हणत उदयनराजेंनी शरद पवारांवर सकाळी निशाणा साधला होता.                                        

మరింత సమాచారం తెలుసుకోండి: