लोकसभा निवडणूकीनंतर आता सर्वत्र विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. सर्वच पक्षांनी पक्षबांधणी, राजकीय दौरे, भेटीगाठी यांसारख्या राजकीय घडामोडींना उधाण आले आहेत. सर्वच पक्षांनी जनसंपर्क साधण्यासाठी वेगवेगळ्या यात्रांचे आयोजन केले आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपची महाजनादेश यात्रा सुरु आहे.

या यात्रेनिमित्त भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह सोलापुरात येणार आहेत. अमित शाह यांची सोलापुरातील सभा उधळून लावण्याचा इशारा भीम आर्मीने दिला आहे. महाराष्ट्रात दलित सुरक्षित नाहीत, असं म्हणत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महाजानादेश यात्रा घेत फिरत आहेत, असा आरोप भीम आर्मीचा आहे. त्यामुळे भीम आर्मीने ही सभा उधळून लावण्याचा इशारा दिला आहे.

भीम आर्मीचं असं म्हणन आहे की ‘दोन महिन्यापूर्वी मुंबईतील चुनाभट्टी परिसरात राहणाऱ्या जालन्याच्या तरुणीवर सामूहिक बलत्कार झाला. पीडितेवर उपचार सुरु असताना तिचा मृत्यू झाला. या प्रकरणातील आरोपी अद्यापही सापडले नाहीत. त्यामुळे मुख्यमंत्री हे गृहखाते सांभाळण्यास सक्षम नसल्याचा आरोप करत उद्या होणारी जाहीर सभा उधळण्याचा इशारा भीम आर्मीने दिला आहे.

दरम्यान, अमित शहांच्या सोलापूरमध्ये होणाऱ्या सभेत अनेक नेते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यात उस्मानाबादचे नेते राणा जगजितसिंह पाटील, कोल्हापूरचे माजी खासदार धनंजय महाडिक यांचा समावेश आहे.                                             

మరింత సమాచారం తెలుసుకోండి: