केंद्रीय सांस्कृतिक आणि पर्यटन राज्यमंत्री प्रल्हाद पटेल यांच्या मुलाला पोलिसांनी अटक केली आहे. हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी ही अटक करण्यात आली आहे.

     केंद्रीय मंत्री प्रल्हाद पटेल यांचा मुलगा प्रबळ पटेल याच्यावर हत्येचा प्रयत्न केल्याचा आरोप लावण्यात आला आहे. याप्रकरणीच मध्यप्रदेश पोलिसांनी त्याला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भोपाळपासून 25 किमी दूर नरसिंहपूरच्या गोटेगांव येथे दोन गटांमध्ये वाद झाला होता. या वादाचं रुपांतर हाणामारीत झाला. यावेळी गोळ्याही झाडण्यात आल्या. ज्यामध्ये एक जण गंभीर जखमी झाला. त्याला जबलपूरमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

     हिमांशु राठौर या व्यक्तीने दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. या तक्रारीत त्याने म्हंटले आहे की “मी माझ्या मित्रांसोबत एका लग्नाहून परत येत होतो. कोडमा गावातून मी परत येत असताना गोटेगांव येथे प्रबळ पटेल आणि इतर काही लोकांनी माझ्यावर जीवघेणा हल्ला केला.’ या तक्ररीनंतर पोलिसांनी प्रबळ पटेल याला अटक केली.या सगळ्या प्रकरणी प्रल्हाद पटेल यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली असुन ते म्हणाले की “हे खूपच दु:खद आणि दुर्दैवी आहे. कायदा आपले काम करेल. मी याबाबत यापुढे कोणत्याही प्रकारची टिप्पणी करू इच्छित नाही.’


మరింత సమాచారం తెలుసుకోండి: