औरंगाबाद :  केंद्रीय मंत्री नितिन गडकरी रविवारी औरंगाबाद दौऱ्यावर होते. यावेळी गडकरी यांनी एसएसएमई या मराठवाड्यातील उद्योजकांच्या संस्थेच्या विविध समस्या जाणून घेतल्या. तसेच उद्योगांच्या विविध धोरणांबाबत चर्चा करून भविष्यातील उद्योगांपुढे येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी तत्पर असल्याचे सांगितले. उद्योजकांनी उद्योगांसाठी बँकांवर अवलंबून राहण्यापेक्षा शेअर मार्केट, स्टॉक एक्सचेंज मध्ये गुंतवणूक करावी,तसेच उद्योगांतील नवनिर्मितीवरही भर द्यावा, असेही गडकरी म्हणाले.

 

गडकरी यांनी मराठवाड्यातील रस्ते कामाचा आढावा घेतला. यावेळी जिल्ह्यातील औरंगाबाद-शिर्डी, सोलापूर-धुळे, औरंगाबाद-जळगाव रस्त्यांची कामे सुरू असुन लवकरात लवकर पुर्ण होणार आहे. तसेच परभणी-जिंतुर रस्त्याबाबतची प्रक्रिया लवकरच पुर्ण होणार असल्याचे गडकरी यांनी सांगितले. शेंद्रा-बिडकीन कॉरीडोर, औट्रम घाट बोगद्याचेही काम पहिल्या टप्प्यात पुर्ण करण्याचे निर्देश त्यांनी संबंधितांना दिले असल्याचे सांगितले. रस्त्यांचा विकास झाल्यास उद्योग व पर्यटन वाढीवर नक्कीच सकारात्मक परिणाम होणार असल्याचेही यावेळी नितीन गडकरी यांनी सांगितले.                                                                                                                                                     

మరింత సమాచారం తెలుసుకోండి: