आजपासून सुरू झालेल्या महिला टी20 विश्वचषकात भारतीय महिला क्रिकेट संघाने चार वेळा विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियाच्या संघाचा 17 धावांनी पराभव करत स्पर्धेची सुरुवात विजयाने केली आहे.
प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने 20 ओव्हरमध्ये 4 विकेट गमावत 132 धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा संघ 19.5 ओव्हरमध्ये 115 धावांपर्यंत मजल मारू शकला. पुनम यादवच्या गोलंदाजीसमोर ऑस्ट्रेलियाचा संघ टिकू शकला नाही.
प्रथम फलंदाजीसाठी मैदानात आलेल्या भारतीय संघाच्या स्मृती मंधाना आणि शेफाली वर्मा या जोडीने 41 धावांची भागीदारी केली. मात्र चौथ्या ओव्हरमध्ये मंधाना 10 धावांवर बाद झाली. त्यानंतर जेमीया रॉड्रीगजने 29, कर्णधार हरमनप्रीत कौरने 2 धावा केल्या. भारतीय संघाने दिप्ती शर्माच्या नाबाद 49 आणि वेदा कृष्णमृतीच्या नाबाद 9 धावांच्या जोरावार 132 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून जेसा जोनासेन हिने सर्वाधिक 2 तर गार्डनर आणि पेरीने प्रत्येकी 1 विकेट घेतली.
भारताच्या धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाच्या संघाने 5व्या षटकात 32 धावांवर बेथ मूनीच्या (6) रुपात पहिली विकेट गमावली. त्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या लागोपाठ विकेट पडतच गेल्या. ऑस्ट्रेलियाकडून सर्वाधिक धावा एलायसा हिली (51) आणि एशलेघ गार्डनरने (34) केल्या. इतर कोणतीही खेळाडू दुहेरी आकडा गाठू शकली नाही. भारताकडून सर्वाधिक 4 विकेट्स घेतले. तर शिखा पांडेने 3 आणि राजेश्वरी गायकवाडने 1 विकेट घेत भारताला विजय मिळवून दिला.
click and follow Indiaherald WhatsApp channel