लोकसभा निवडणूकीच्या निकालानंतर राज्यात सर्वत्र विधानसभेचे वारे वाहत आहेत. त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष चांगलेच सक्रीय झाले आहेत. अनेक नेत्यांकडून आपापल्या मतदारसंघाचा आढावा घेण्याचा प्रयत्न सुरु आहे. त्यामुळे नेते आणि कार्यकर्ते आता कामाला लागले आहेत.

याच पार्श्वभूमीवर एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. त्यांनी ‘आगामी निवडणुकीत एमआयएमकडून उमेदवारी मिळावी म्हणून शिवसेना-भाजपचे लोकं मला येऊन भेटत असल्याचा दावा जलील यांनी केला आहे. त्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापण्याची शक्यता आहे.

दरम्यान, इम्तियाज जलील हे एमआयतर्फे महाराष्ट्रात एकमेव उमेदवार होते. त्यांनी औरंगाबादमधून निवडणूक लढवली होती. त्यांनी या निवडणुकीत शिवसेनेच्या चंद्रकांत खैरे यांचा पराभव केला होता. तसेच या निवडणुकीत तत्कालीन भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचे जावई हर्षवर्धन जाधव हेही मैदानात होते.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेत जोरदार इनकमिंग वाढले आहे. त्यामुळे निष्ठावंत कार्यकर्त्यांना संधी मिळण्याची शक्यता कमी आहे. तशी भीती असल्यामुळेच अनेक नेते जलील यांच्याकडे उमेदवारी मागत असल्यांची शक्यता आहे.                                                                                                                                            


మరింత సమాచారం తెలుసుకోండి: