अनेक दिवस चर्चा असलेला अॅपलचा अफोर्डेबल आयफोन एसई २ चे ट्रायल उत्पादन सुरु झाले असून हा फोन आयफोन नाईन नावाने ३१ मार्चला लाँच केला जात असल्याचे जर्मन वेबसाईट आयफोन टिकर डे ने म्हटले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार अॅपल मार्च अखेर एक इवेंट करणार असून त्यात हा फोन सादर केला जाईल. ओरिजिनल आयफोन एसई मार्च मध्येच सादर केला गेला होता. अॅपल अॅनालिस्ट मिग ची कु याने आयफोन नाईनच्या लाँच डेटची माहिती दिली आहे. हा फोन ३ एप्रिल रोजी विक्रीसाठी उपलब्ध केला जाणार असल्याचेही त्यात नमूद आहे.
या फोन संदर्भात अनेक लिक्स यापूर्वी आले आहेत. नवीन माहितीनुसार या फोनसाठी ४.७ इंची किंवा ५.४ इंची एलसीडी डिस्प्ले असेल आणि तो ३ जीबी रॅम, ६४ जीबी व ३ जीबी रॅम आणि १२८ जीबी मेमरी अश्या दोन व्हेरीयंट मध्ये असेल. हा फोन ३९९ डॉलर्स म्हणजे साधारण २८ हजार रुपयांच्या दरम्यान मिळेल. त्याचे डिझाईन आयफोन ८ प्रमाणे असून बेजल पातळ आहे. फोनला ग्लास बॅक कव्हर असेल आणि तो ए १३ बायोनिक चीपसेट सह येईल.
click and follow Indiaherald WhatsApp channel