विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेसने ‘महा पर्दाफाश यात्रा’ काढत मोर्चेबांधणीला सुरवात केली आहे. तर येत्या विधानसभा निवडणुकीला कॉंग्रेस सर्व मित्र पक्षांना सोबत घेऊन जाणार असल्याची माहिती कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे. कोल्हापुरात पत्रकारांशी बोलत असताना त्यांनी याबाबत वक्तव्य केले आहे.

बाळासाहेब थोरात म्हणाले की, आगामी निवडणुका मित्रपक्षांना घेऊनच लढणार आहे. तसेच वंचित बहुजन आघाडी बरोबरही चर्चा सुरु आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीला कॉंग्रेस हे आघाडीकरून सामोरी जाणार आहे.

सध्या कॉंग्रेसची अवस्था बिकट झाली आहे. अनेक नेत्यांनी पक्षाला रामराम ठोकत भाजप-सेनेमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर कॉंग्रेस पक्षाला मोठी गळती लागली असल्याचं दिसत आहे.

दरम्यान राज्याच्या विधानसभा निवडणुका आता काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. त्यामुळे प्रत्यके राजकीय पक्षाने मोर्चेबांधणीला सुरवात केली आहे. मात्र निवडणुकी आधीच निकालाबाबत भाजपने एक सर्व्हे केला आहे.
या सर्व्हेनुसार भाजप महायुतीला 229 जागांवर विजय मिळणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मात्र या सर्व्हेबाबत कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी शंका व्यक्त केली आहे. भाजपचा हा सर्व्हे जुना असून प्रचाराची एक रणनीती आहे, अशी टीका केली आहे.                                                                       


మరింత సమాచారం తెలుసుకోండి: