करोना विषाणूची पहिली लस अमेरिकेतील एका ४२ वर्षीय निरोगी महिलेला देण्यात आली असून ही महिला दोन मुलांची आई आहे. सोमवारी सियाटल येथे या लसचा पहिला डोस परीक्षणासाठी या महिलेला टोचला गेला. करोनासाठीची ही लस जगात विक्रमी वेळात बनविली गेलेली पहिली लस बनली असून प्राण्यांवर चाचण्या न करता ही प्रथम माणसालाच दिली गेली आहे.
संशोधकांनी या लसीच्या ट्रायल साठी १८ ते ५५ वयोगटातील ४५ व्हॉलिंटीअर निवडले असून या लसीच्या पूर्ण चाचण्या होऊन ती बाजारात येण्यास आणखी अनेक महिने वाट पहावी लागेल. ही लस पूर्ण सुरक्षित आहे वा नाही हे त्याअगोदर निश्चित करावे लागणार आहे. सध्या या लशीला एम- आरएनए-१२७३ असे नाव दिले गेले आहे. या लसीच्या फेज दोन, फेज तीन ट्रायल घेतल्या जाणार आहेत.
click and follow Indiaherald WhatsApp channel