अक्षय कुमारसोबत ‘गोल्ड’ चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये अभिनेत्री मौनी रॉयने पदार्पण केले होते. त्यानंतर ती राजकुमार रावसोबत मेड इन चायनामध्ये देखील झळकली होती. तिच मौली आता सध्या मालदीव्समध्ये सुट्टी एन्जॉय करत आहे.
या व्हेकेशनचे काही फोटो मौनीने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केले आहेत. सोशल मीडियावर ज्याची जोरदार चर्चा होत आहे. मौनीचा बोल्ड अंदाज शेअर केलेल्या या टॉपलेस फोटोमध्ये पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावर तिचे हे फोटो व्हायरल होत आहेत.
मौनीने यातील एक फोटो शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, हे पुस्तक मी सहजच उघडले…’ त्यामुळे या फोटोंसोबतच तिच्या या कॅप्शनचीही चर्चा सोशल मीडियावर होत आहे. मौनीची अशाप्रकारे बोल्ड फोटो शेअर करण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. तिने याआधी देखील अनेकदा बिकिनीमधील फोटो आपल्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत. मौनीला बॉलिवूडमध्ये येण्याआधी कलर्स टीव्हीवरील ‘नागिन’ आणि ‘नागिन 2’ या लोकप्रिय मालिकांमुळे प्रचंड लोकप्रियता मिळाली.
मौनीचा सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग आहे. तिचे 11 मिलियन पेक्षा जास्त फॉलोअर्स फक्त इन्स्टाग्रामवर आहे. अक्षय कुमारच्या ‘गोल्ड’नंतर ती राजकुमार रावसोबत ‘मेड इन चायना’ मध्ये दिसली होती. मौनीचे नाव मागच्या काही काळापासून दिग्दर्शक अयान मुखर्जी याच्याशी जोडले जात आहे. अयानच्या ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटात लवकरच मौनी दिसणार आहे.
click and follow Indiaherald WhatsApp channel