पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्राची कॉन्फ्रंस ऑफ द पार्टीज म्हणजेच कॉपच्या 14 व्या अधिवेशनात संबोधित केले. हे अधिवेशन उत्तर प्रदेशच्या ग्रेटर नोएडा येथे आयोजित करण्यात आले होते.
या अधिवेशनात जलवायू परिवर्तन, जैव विविधता याबद्दल चर्चा केली जात आहे. यावेळी बोलताना नरेंद्र मोदी म्हणाले की, संपुर्ण जगाने पुर्नवापर न करता येणाऱ्या प्लास्टिकचा (सिंगल युज प्लास्टिक) वापर करणे बंद केले पाहिजे. या अधिवेशनात 196 देशांचे प्रतिनिधी सहभागी झाले आहेत.
याचबरोबर 2 ऑक्टोंबरपासून महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या निमित्ताने देशभरात सहा प्लास्टिक वस्तूंवर बंदी आणण्यात येणार आहे. यामध्ये प्लास्टिक, कप्स,प्लेट्स, छोट्या बॉटल्स इत्यादी गोष्टींचा समावेश आहे.
तसेच, अभ्यासात दिसून आले आहे की, प्लास्टिकमुळे समुद्री जीवांवर मोठ्या प्रमाणात परिणाम होत आहे. याचमुळे युरोपियन युनियनने 2021 पासून सिंगल युज प्लास्टिकवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.
कॉप-14 च्या अधिवेशनात बोलताना पंतप्रधान मोदींनी जलवायू परिवर्तनामुळे बायोडायवर्सिटी आणि जमीनीवर होणाऱ्या परिणामांचा देखील उल्लेख केला. याचबरोबर जगभरात सिंगल युज प्लास्टिकचा वापर बंद करण्याचे आवाहन देखील केले.
click and follow Indiaherald WhatsApp channel