मुंबई : कोरोना विषाणू जगात धुमाकूळ घालतो आहे. कोरोनाचा फटका आता पोलिसांना देखील बसत आहे. चिंतेची बाब म्हणजे राज्यभरात कोरोनाबाधित पोलिसांची संख्या वाढतच आहे. राज्यभरातील बाधित पोलिसांचा आकडा 714 वर पोहोचला आहे.
तसेच आज आणखी 96 पोलिसांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे अवघ्या चार दिवसात 257 पोलिसांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. यामध्ये 81 अधिकाऱ्यांना आणि 633 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
यापैकी 648 जणांवर उपचार सुरू आहेत. तर 61 पोलीस कर्मचाऱ्यांनी केली कोरोनावर मात केली आहे. दरम्यान दुर्दैव्याने 5 जनांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. या 648 मध्ये 71 पोलीस अधिकारी तर 577 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. बऱ्या झालेल्या 61 पैकी 10 जण पोलीस अधिकारी तर 51 जण हे पोलीस कर्मचारी असल्याची माहिती पोलीस प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
click and follow Indiaherald WhatsApp channel