अकोला : अकोल्यात आणखी 18 कोरोना पॉझिटिव्ह सापडले आहेत. आतापर्यंत जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या 186 वर गेली आहे. तर ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या 111 वर आहे. तर एका कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
दूसरीकडे एक दिलसादायक बातमी आहे. आज तब्बल 41 रुग्ण पूर्णता बरे झाल्यानं त्यांना शासकीय रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
आज सकाळी पॉझिटिव्ह आढळलेल्या 18 रुग्णात नऊ महिला व नऊ पुरुष आहेत. त्यातील सात जण खैर मोहम्मद प्लॉट मधील रहिवासी आहेत. तर तीन जण गवळीपुरा, तीन जण रामनगर, आणि बापू नगर अकोट फैल, अकोट फैल, सराफा बाजार, जुने शहर पोलीस स्टेशन, जुने आलसी प्लॉट येथील प्रत्येकी एक जण याप्रमाणे रहिवासी आहेत.
दरम्यान एक 62 वर्षीय न्यू भीमनगर येथील महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. मृत्यू काल रात्री झाला आहे. ही महिला सोमवार ४ मे रोजी दाखल झाली होती. तसेच काल रात्रीच 41 रुग्णांना पूर्ण बरे झाल्यानंतर डिस्चार्ज करण्यात आले. हे रुग्ण सिंधी कॅम्प, कृषि नगर, अकोट फैल व बैदपूरा येथील रहिवासी आहेत.
click and follow Indiaherald WhatsApp channel