मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा बारामतीत झालेल्या राड्यामुळे चांगलीच गाजली. पवार कुटुंबीयांवर केलेल्या टीकेला प्रत्त्युत्तर म्हणून कार्यकर्त्यांनी थेट मुख्यमंत्र्याचं भाषण सुरु असतानाच ‘एकच वादा, अजित दादा’ अशी घोषणाबाजी केली. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आपलं भाषण आटोपतं घ्यावं लागलं. या सर्व गोंधळामुळे पोलिसांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज करत त्यांना पांगवण्याचा प्रयत्न केला.

बारामतीत झालेल्या महाजनादेश यात्रेच्या स्वागत सभेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, कामगार राज्यमंत्री बाळा भेगडे, खासदार अमर साबळे, माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी उपस्थिती लावली. मुख्यमंत्र्यांची सभा होणार असल्याने सर्वसामान्य नागरिक, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. विशेष म्हणजे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनीही या ठिकाणी गर्दी केली होती.

सकाळीच या सभेच्या ठिकाणी लावलेल्या साऊंड सिस्टमवरून वाद निर्माण झाला होता. गणेशोत्सव, दहीहंडी अशा उत्सवावेळी साऊंड सिस्टम लावण्यास प्रतिबंध केला जातो. मग मुख्यमंत्र्यांच्या सभेलाच साऊंड सिस्टम लावण्यास परवानगी कशी असा सवाल करत गणेश मंडळासह गोविंदा पथकांनी पोलीस प्रशासनाला धारेवर धरलं.

त्यामुळे पोलिसांना या ठिकाणची साऊंड सिस्टम हटवणं भाग पडलं. याचाच धागा पकडत मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात बारामतीकरांनी आपला धसका घेतल्याचं म्हटलं. त्यानंतर त्यांनी आपल्या भाषणात बारामतीकरांनी आपला धसका घेतल्याचं म्हटलं.                                                                     


మరింత సమాచారం తెలుసుకోండి: